Ad will apear here
Next
‘प्रेमा तुझा रंग कसा’तून उलगडणार प्रेमाची काळी बाजू
मुंबई : आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचे चित्रण करण्यात आले आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असते, प्रेमाची भावना गुलाबी असते, असे दाखवण्यात आले. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू ‘स्टार प्रवाह’ ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेतून मांडणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच केवळ प्रेमकथांतील गुन्ह्यांवर आधारित ही मालिका येत असून, १६ जुलैपासून रात्री दहा वाजता ही मालिका पाहता येणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

‘स्टार प्रवाह’ने नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय, वेगळी मांडणी आणि आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून नवीन कलाकार प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात ‘स्टार प्रवाह’ची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख अधोरेखित करणार आहे ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही नवी मालिका. मराठी टेलिव्हिजनवर प्रेमाची काळी बाजू पहिल्यांदाच सादर करणारी ही नवी मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री १० वाजता दाखविली जाणार आहे.

सत्य घटनांपासून प्रेरित अशा प्रेमकथा, त्यातील गुन्हे, त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर गुन्ह्यांच्या तपासावर आधारित अनेक कार्यक्रम झाले असले, तरी केवळ प्रेमाशी संबंधित गुन्ह्यांवर आधारित मालिका करण्याचा पहिला प्रयत्न ‘स्टार प्रवाह’ करत आहे. त्यामुळेच या मालिकेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.

या नव्या मालिकेविषयी सांगताना ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर म्हणाल्या, ‘लक्ष्य आणि पंचनामा या कार्यक्रमांना मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर प्रेक्षकांसोबत ‘स्टार प्रवाह’चे एक वेगळे नाते निर्माण झाले आहे. या नात्याचा मान ठेऊन पुढची पायरी गाठण्याचा आमचा मानस आहे. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ हा कार्यक्रम ही पायरी गाठेल याची आम्हाला खात्री आहे.’

गश्मीर महाजनीने अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. या मालिकेतून गश्मीर छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तो या मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहे. त्याच्या खास शैलीने मालिकेतील कथांचे नाट्य अधिक खुलणार आहे. याबाबत गश्मीर म्हणाला, ‘एक संवेदशनशील व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत आपले मत मांडणे हे मी माझे कर्तव्य समजतो. बऱ्या-वाईट घटनांबद्दल मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मित्रपरिवाराशी नेहमी संवाद साधतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता प्रेक्षकांशीही मला मनमोकळा संवाद साधायला मिळणार आहे.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZSKBQ
Similar Posts
‘मला क्रिएटिव्ह फ्रिडम लागतं’ मुंबई : अभिनेता गश्मीर महाजनी याने ‘स्टार प्रवाह’च्या ‘प्रेमा तुझा रंग कसा’ या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर पदार्पण केले असून, ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजता पहायला मिळणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने गश्मीर महाजनी याच्याशी साधलेला संवाद...
‘सेट नव्हे, हे तर माझे दुसरे घर’ मुंबई : नात्यांतील हरवलेल्या संवादाचा शोध घेणारी ‘ललित २०५’ ही मालिका सहा ऑस्टपासून ‘स्टार प्रवाह’वर सुरू झाली आहे. या मालिकेत संग्राम समेळ नील राजाध्यक्ष ही भूमिका साकारतोय. याच निमित्ताने संग्रामशी केलेली ही खास बातचित...
गश्मीर महाजनीचा ‘स्टार प्रवाह’वर नवा कार्यक्रम मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील हँडसम हंक म्हणून ओळखला जाणारा गश्मीर महाजनी ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर एक अनोखा शो घेऊन येत आहे. गश्मीरचे छोट्या पडद्यावरील पदार्पण दिमाखदार असणार आहे.
सई देवधरने आयोजित केली खास बर्थ डे पार्टी मुंबई : आईचा वाढदिवस मुलांसाठी नेहमीच खास असतो. अशाच खास दिवसाचे औचित्य साधून अभिनेत्री सई देवधरनेसुद्धा अशीच एक खास पार्टी आयोजित करत आपल्या आईला सरप्राईज दिले. आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढत सईने आईचा म्हणजेच ‘स्टार प्रवाह’च्या कार्यक्रम प्रमुख श्रावणी देवधर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language